आदित्य,
तुमचा असा प्रतिसाद अपेक्षितच होता.मीही अगदी गांभीर्याने लिहीलेले आहे. अशुद्ध लेख्ननाने 'चवदार पदार्थाचा आस्वाद घेतांना दाताखाली खडे आल्यावर जसा रसभंग (व कधी कधी दंतभंग) होतो' तसे होते.'मनोगता' वर नव्याने लिहणाऱ्यांच्या बाबतीत आरंभी टंकलेखनाच्या चुका होणे साहजिक आहे.पण वाईट याचे वाटते कि टंकलेखनात सवयीने सफाई आल्यावरही ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका,मूळ शब्दच नीट माहित नसल्याने,केल्या जातात. बरं, चुका दाखवून दिल्यास' यांना फक्त चुकाच दिसतात' अशी ओरड होते. चुका न दाखविल्यातर अशुद्ध शब्द सर्रास तसेच लिहले जातात.मराठीतील क्रियापदेही ऱ्हस्वांत (उदाः असावि, नसावि) लिहली जातात.
आणखी  एक म्हणजे 'गोड' हा शब्द 'गोद' असा' लिहीला जातो याचे कारण मनोगत टंकलेखन नीट जमेपर्यंत थांबण्याची तयारी नसते. त्यामुळे वाचकाने अशा ढोबळ चुकाही 'गोड' मानून वर "वा,छान" असा प्रतिसाद द्यावा व तोही त्वरीत द्यावा अशी अपेक्षा असते.अशुद्ध लेख्ननामुळे चांगल्या रचनेलाही प्रतिसाद द्यावा असे वाटत नाही. यामुळे "इथे नवोदितांना प्रतिसाद/प्रोत्साहन दिले जात नाही" असेही आरोप होतात, हे वेगळेच.
जगात इतरत्र 'सब  कुछ चलता है' मग शुद्धलेख्ननात का नाही? यात कष्ट न घेण्याची वृत्तीच दिसून येते. "मी देवळात आलो याचे कौतुक नाही पण गाभाऱ्यात चप्पल  घालून का आलास? असे विचारतात' ह्याचा राग येत असल्यास गाभाऱ्यात चप्पल  घालून न जाण्याचे भान ठेवणे हा शहाणपणा नाही का?

मला वाटते इतके पुरे.
प्रामाणिक मत. राग नसावा.

जयन्ता५२