आदित्य ने जे काही लिहिले आहे ते अतिशय मुद्देसूद आणि संतुलित आहे. त्यात काहिही आक्षेपार्ह वाटले नाही. शब्द नेमके आणि वाक्ये तर स्पष्ट आहेत बाबा. मुद्द्याने मुद्दा खोडून काढावा, जे काही प्रतिसाद आले आहेत ते योग्य वाटत नाहीत. आदित्य ने आपली भूमिका नीट मांडली असताना विनाकारण 'पिसाट' वगैरे भलतेच वळण लावणे किती योग्य आहे?
शुद्धलेखन आपल्या जागी योग्यच आहे आणि आदित्य ने ते कुठेही अमान्य केले नाहिये. फक्त त्याचा अतिरेक होऊ नये हेच त्याचे म्हणणे आहे. त्यात गैर ते काय? त्या करिता एवढे जळजळीत प्रतिसाद नको होते. ते म्हणतात ना, 'सांगायला गेलो तर टांगायला नेलं', तशातली गत झाली ही.
बिपिन.
जाता जाता....
एखादी गोष्ट करण्याचा मूळ हेतू बाजुला राहून कर्मकांडाचेच जास्त अवडंबर माजवले जाते.
एका गावात एक भटजी होते. ते रोज गावातल्या देवळात पूजा करत असत. साग्रसंगित पूजा वगैरे झाली की ते देवासमोर उभे राहून थोडे गुडघ्यातून वाकत असत. त्यांचा मुलगा ते रोज बघत असे. त्याने एके दिवशी विचारले, 'बाबा, मी पण सगळी पूजा अर्चा शिकलो, सगळं कर्मकांड शिकलो पण हे तुम्ही काय करता? देवापुढे उभे राहून गुडघे थोडे का वाकवता? ' गुरूजी म्हणाले, 'माहित नाही नक्की पण माझे वडिल, तुझे आजोबा, असेच करायचे म्हणून मी पण करतो. ' मुलगा विचारात पडतो. पण त्याचे आजोबा अजून असतात म्हणून तो ठरवतो की त्यांनाच जाऊन विचारावे. तो जातो आजोबांकडे आणि विचारतो. आजोबा म्हणतात, 'अरे बाळा मी पडलो थोडा स्थूल शरिराचा त्यामुळे पूजा करून उठलो की माझे सोवळे मागे 'पार्श्वभागी' अडकायचे. सगळ्यांसमोर ते पटकन सोडवू शकत नसे म्हणून मी आपली युक्ती करायचो. थोडा गुडघ्यात वाकायचो'.