शुद्ध मराठी- धन्यवाद! तुम्ही सुचवलेले सगळेच पर्याय थोडे थोडे पटले, पण अपथ्य/कुपथ्य ह्यांच्या शब्दछटा वेगवेगळ्या आहेत, आणि मला त्यांचे अर्थही नीट माहिती नाहीत, तर कृपया आणखी तपशीलात समजावून सांगू शकाल काय?
ऍलर्जीव्यतिरिक्त काही कारणानेही पदार्थ "वर्ज्य" असू शकतो, तसंच "वावडे" ह्या शब्दातून ऍलर्जीपेक्षा नावड व्यक्त होते, असं मला वाटतं. तुमचा ह्यावर काय विचार आहे?