प्रिय आदित्य,
आपण लिहीत राहा. सरावाने आपोआपच चुका कमी कमी होत जातात. मी शाळा सोडल्यानंतर ( १९७९) मराठी जवळपास लिहिण्याचे विसरूनच गेलो होतो. मनोगतवर आल्यानंतर परत लिहायला सुरवात केली. म्हटला, मृत्यू, तुकाराम, अजून इत्यादी शब्द लिहिताना बरोबर की चूक हे समजत नसे.
काळजीपूर्वक वर्तमानपत्र आणि पुस्तके वाचत राहिलो. मनोगतचे शुद्धी चिकित्सक एक बऱ्यापैकी देणगी वाटली.
तरीपण लिहीत राहिलो. कोणी चुका काढल्यातर नम्रपणे मात्र स्वीकारत गेलो.
आपण ही सरावाचे सातत्य आणि नम्रपणा यावर कायम राहावे. शेवटी आपले मराठीवरचे प्रेम आहे आणि हे लिहीत राहणे आणि वाचत राहणे यावरूनच ते सिद्ध होत राहील.
आपला,
(असंख्य चुका करणारा) द्वारकानाथ कलंत्री
अवांतर : जयंता५२ यांना आपण बाळ हे संबोधन करायला नको होते. ते ज्येठ आहेत आणि आपण त्यांचा सन्मान ठेवायला पाहिजे.