बाय द वे, आपला शुद्धिचिकित्सक तुमचा घेवून हा शब्द चुकीचा दाखवतोय.

बरोबर. असे अनेक दोष दिसणे शक्य आहे.

शुद्धिचिकित्सक परिपूर्ण नाही. सुधारणांना त्यात वाव आहे. वेळोवेळी सदस्य अशा प्रकारे चुका/सुधारणा लक्षात आणून देतात आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार त्यात सुधारणा केली जाते. तरीही जवळजवळ ८० ते ९० टक्के प्रसंगी शुद्धिचिकित्सकाच्या सुधारणा उपयोगी होतात असा अनुभव सदस्यांनी सांगितलेला आहे.

मागच्या वर्षी विदागाराला अपघात झाल्यावर शुद्धिचिकित्सक वितरित विदागारावर आधारित करण्यात आला. ते करीत असताना विदागाराची जुनी आवृत्ती वापरायला लागली. दोष तसेच राहण्याचे आणि निवारणाला वेळ लागण्याचे ते एक प्रमुख कारण आहे.