भाषा ही प्रवाही गोष्ट आहे.
हे खरे
जर आपण मराठी शब्दांचा आग्रह, पर्यायी शब्द वापरत गेलो तर खटकणारही नाही उलट कोणी इतर शब्द वापरले तर ऐकणाऱ्यांना काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटेल.
पण हे मात्र पटले नाही. पर्यायी शब्द वापरू नयेत असे माझे म्हणणे मुळीच नाही. परंतु तो पर्यायी शब्द त्याला अचूक बसला पाहिजे. बरोब्बर तिच अर्थछटा दाखवत असला पाहिजे असे माझे म्हणणे आहे. अमर्यादित म्हणजे कुठल्याही मर्यादेशिवाय. सांबाराला मर्यादा? थोडं खटकत नाही का? ह्यासाठी हवं तर आपण नवीन शब्द बनवून तो रुळवू पण हा शब्द नको असे मला वाटते. आणखी कोणत्यातरी सदरात तुम्ही टॅलेंट ला बुद्धीमत्ता हा शब्द सुचवला आहे. तोही असाच खटकला. टॅलेंट म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे, तर एखाद्या व्यवसायाला किंवा गोष्टीला आवश्यक असलेली बौद्धिक, शैक्षणिक, मानसिक , शारिरीक अशी परिपूर्ण पात्रता. खरं म्हणजे हा अर्थ सुद्धा कुठेतरी तोकडा पडतोय. माझ्याकडच्या शब्दकोशात याचा अर्थ अंगची कला, नैसर्गिक देणगी, प्रतिभा, प्रज्ञा असा वैविद्ध्यपूर्ण दिला आहे, हाही एका शब्दात पकडणे तसे अशक्यच. काही शब्द ही त्या त्या भाषेची खासियत असते. भाषांतराच्या किंवा आपलीच भाषा वापरण्याच्या अट्टाहासात आपण त्या भाषेचा अपमान करतो असे वाटते. प्रत्येक भाषेतले १०० % शब्द दूसऱ्या भाषेत आणता येत नाही.म्हणून अजिबात प्रतिशब्द शोधू नयेत असे नाही. पण त्याजागी उपलब्ध शब्दांमधीलच कुठलातरी प्रतिशब्द वापरणे हे मला रुचले नाही. असो चू.भू. द्या.घ्या