तुम्ही भलतेच कष्टपूर्वक लिहिले आहे हे असे दिसते. चित्रे काय आलेख काय आकृत्या काय! वा वा. इतका जीव तोडून तुम्हाला हे लिहावेसे वाटले ही कमाल आहे.
मात्र एक आहे वाचकाची आणि आपली वेव्हलेंग्थ जुळली नाही तर तो मध्येच सोडून जाईल. मात्र शेवटपर्यंत वाचणाऱ्याला मेजवानी आहे.
असेच चालू राहू द्या.
एकंदर आविर्भाव पु ल देशपांड्यांच्या सहानुभाव पंथासारखा वाटला जरी त्यात आणि ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे तरी दोन्हीतली पोटतिडीक सारखीच आहे.
सुरेख
-श्री सर (दोन्ही)