खरं आहे, मूळ कल्पना माझी नाहीये. ती बॉबी हेंडर्सन नावाच्या माणसाची आहे. आणि वेगळ्या संदर्भात आहे. अमेरिकेतील कॅन्झस स्कूल बोर्ड या शिक्षणसंस्थेने (मला वाटते हे शिक्षणखाते असावे) डार्विनच्या उत्क्रांतिवादासोबत 'इंटेलिजंट थिअरी' (जिच्यात कोणीतरी एक विश्वनिर्माता आहे आणि त्याने सर्व विश्वाची निर्मिती केली आहे असे म्हटले आहे) शिकवली जावी (ही थिअरी 'साइंटिफिक' आहे म्हणून ती शिकवली जावी असे तिच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे आहे) असा निर्णय घेतला आहे.
ह्या (भयंकर) निर्णयाला प्रतिसाद म्हणून मूळ लेखकाने त्या संस्थेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे.
आपल्याकडे असा काही निर्णय अजून घेतला गेला नाहीये (ही आनंदाची गोष्ट आहे) पण आपल्याकडे 'इंटेलिजंट थिअरी'सारख्या इतर गोष्टींवर विश्वास ठेवणारी अनेक मंडळी आहेत म्हणून मला हा लेख लिहावासा वाटला. हा लेख त्या पत्राचे स्वैर भाषांतर आहे.
लेखातील एकही आकृती माझी नाहीये. मी मूळ आकृत्यांमध्ये फक्त थोडासा बदल केला आहे. (त्यांचेसुद्धा भाषांतर केले आहे इतकेच.)
मूळ पत्र वेंगँझा.कॉम ह्या ठिकाणी सापडेल. (महाजालावर लेखातील चित्रे चढवताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मा. प्रशासकांच्या साहाय्याने त्या महाजालावर चढवल्या आहेत. पण त्या साऱ्या गडबडीत मूळ पत्राचा संदर्भ द्यायचा राहून गेला होता.)
लिखाणाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

कलोअ, चैत रे चैत.