मितालीताई,
बहुतेक 'त्या'नेच तुम्हाला हा लेख (आणि हा पंथ) न कळावा अशी काहीतरी योजना करून ठेवली असणार आहे. परत एकदा वाचून पाहा, कळेल.
अजून एक गोष्ट लेखात सांगायची राहून गेली होती. ज्याची श्रद्धा असते त्यालाच हा लेख आणि हा पंथ कळेल. तेव्हा श्रद्धा ठेवा की 'तो' तुमच्यासोबत आहे. जर अशी श्रद्धा ठेवली नाही (आणि त्याच्या महापूजेचा महाप्रसाद घेतला नाही) तर त्याचा कोप होईल आणि मग काय काय होईल हे सांगणे कठीण आहे. कुठेतरी म्हटलंच आहे की 'श्रद्धावाँल्लभते ज्ञानम्'... श्रद्धा ठेवणाऱ्याला ज्ञानाचा लाभ होतो. 'त्या'च्यावरील श्रद्धा हाच क्षुद्र मानवाच्या जीवनाचा एकमेव आधार आहे...
कश्रअ (कळावे (फक्त 'त्या'च्यावरच) श्रद्धा असावी)
- चैत रे चैत.