पुन्हा बाळपण अनुभवण्याची तुमची कल्पना सुंदर आहे.

तुमचे लेखन चांगले आहे. समजायला सोपे आहे आणि आबालवृद्धांचे मन प्रसन्न करणारे आहे. तुमची मातृभाषा मराठी नसावी असे वाटते. तसे असेल तर तुमचा मराठी लिहिण्याचा हा प्रयत्न अभिनंदनीय आहे.

आंतरजालावर लेखन करताना, प्रतिसाद देताना लेखकाच्या वयाची कल्पना न आल्याने अनर्थ होऊ शकतात. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असाव्या असे तुमच्या लेखनावरून वाटते. व्यक्ती हा शब्द हिंदीत पुल्लिंगी आहे तर मराठीत तो स्त्रीलिंगी आहे.

आज व्यक्ती लहान असतो तेव्हा आई ही माता असते; तो तरुण असतो तेव्हा आई ही मैत्रीण असते आणि जेवा तो वृद्ध असतो तेव्हा आई त्याच्या जीवनाला दिशा देणारा आत्मा असते.

हे वाक्य

आज व्यक्ती लहान असते तेव्हा आई ही माता असते; ती तरुण असते तेव्हा आई ही मैत्रीण असते आणि जेवा ती वृद्ध असतो तेव्हा आई तिच्या जीवनाला दिशा देणारा आत्मा असते.

असे वाक्य हवे.

तुम्ही माझ्या सूचनेचा राग मानणार नाही अशी आशा आहे.