वा काय लेखन आहे. हे गोष्टीबरोबरच एखाद्या पटकथेइतके चित्रमय आहे. तुम्ही शब्दाबरोबरच कॅमेरा घेऊन फिरताय असे वाटले.

आतापर्यंत फकत एक भाग वाचून झाला. इतके तपशील असणारी गोष्ट त्यातल्या माणसांच्या कथा, स्वभाव ठिकाणे हे सगळे जमवायला आणि लिहून काढायला तुम्हाला किती दिवस लागतात हो ते कृपया सांगाल का? कारण हे काही साधेसुधे लेखन वाटत नाही. बरेच कष्ट करून लिहिलेले वाटते.

सावंत, राहुल, छायाकाकू, मृणाल, सतबीर, नामदेव यादव. बापरे किती पात्रे ही .... इतक्या ठिकाणाहून गोष्ट सुरू होते ती आता पुढे कुठे जाणार ते पाहावे वाटते.

धन्यवाद. तुमचे बाकी लेखनही (वेळात वेळ काढून ! ) वाचले पाहिजे आता.