'तुर' या शब्दाची उत्पत्ती पटते खरी, पण 'हातावर तुरी देणे' मधे हा अर्थ असेल असे वाटत नाही. हातावर तुरी म्हणजे चतुराई दाखवून 'निसटून' येणे अशा अर्थाने वापरलेले मी पाहिले आहे. घाईघाईने (त्वराशी जवळचा अर्थ) निघून किंवा पळून (!)जाणे या अर्थानी वापरलेले पाहिलेले नाही.
कदाचित या वाक् प्रचारा मागे एखादी गोष्ट असावी असे वाटते.
तुमची शब्दाचा माग काढण्याची पद्धत मात्र खरोखर वाखाणण्यासारखी आहे. वाक्प्रचारांचे मूळ अशा प्रकारचा एक विभाग इथे सुरु करता येईल. प्रशासकांना कसे कळवायचे?