एकाकी कशि पाहि वाट बसची माझ्यापुढे कन्यका!
होती फारच वाचण्यात गढली ती 'आंग्ल' कादंबरी
गोरी, नाजुक, उंच, गोंडस, अती रेखीव अन् त्यावरी
     घाली निष्ठुर जीन छान विटकी, टी शर्टही 'बोलका'!

     एरिंगा, चमकी नि रंगित नखे, कोल्हापुरी चप्पल,
लाली, काजळ, मुक्त केस - अशि ती 'शोकेस' फॅशन्सची!
न्याहाळी किति वेळ मी मधुर ती 'निःशब्द' मुद्रा तिची
     झालो पागल हो, समीप बघुनी ऐसा 'खवा' केवळ!

अतिशय मस्त! डोळ्यांसमोर ज्ञानेश सोनार ह्यांचे एखादे व्यंगचित्रच उभे राहिल्यासारखे वाटले. शेवट तर झकासच आहे.