जळजळीत नागडे सत्य इतके स्पष्टपणे वाचायला जीवावर तर येतेच पण त्यापासून पळणे शक्य नाही, हे परत एकदा लक्षात आले. केवळ मनाने, स्वभावाने अथवा आचारविचारांनी चांगले असून भागत नाही हेच परत एकदा अधोरेखित झाल्यासारखे वाटले. अशा परिस्थितीतून जावे लागल्यास आत्महत्या करणे हा मार्ग नसून उसळून न्याय्य बदला घेणेच उचित असे मलातरी वाटते, अर्थात नुसत्या बाता मारायला काही लागत नाही असे म्हणण्यालाही जागा आहेच ! आयुष्य जगण्यातली सच्ची मजा नक्की कशात आहे, हेच न उमगलेल्या सो कॉल्ड स्त्री - पुरूषांना योग्य उपरती कधी सुचणार कोण जाणे..
चौकस,
तुमचे लिखाण नेहमीच खूप आवडते ( नेहमीच प्रतिसाद देता येण्याइतकी सवड मिळतेच असे नाही त्यामुळे प्रतिसाद न देण्याबद्दल माफ करा, परंतु आपली लिखाणाची पद्धत आणि त्यामागील भावना अत्यंत आवडतात. ), तसे याहीवेळी अत्यंत आवडले. पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा.