पुण्यामुंबईजवळ तरी असे कोणतेही पवित्र ठिकाण उपलब्ध झाले नाही. (ते इतर पंथांनी एकदम अपवित्र केले आहे. आणि मुळातच ह्या पंथाचे श्रद्धास्थान हे खाद्यपदार्थाशी निगडित असल्याने पावित्र्य (ह्याला सामान्य मराठीत स्वच्छता आणि जनमान्य मराठीत hygiene असे म्हणतात) हे आत्यंतिक आवश्यक आहे.)

त्यामुळे, आमचे पवित्र तीर्थस्थळ हे कुरडईवाडी (म्हणजे कुर्डुवाडी नव्हे) आहे. कुठे आहे हे विचाराल तर एकच सांगतो, 'त्या'च्यावर जर श्रद्धा असेल तर कुरडईवाडी आपल्याला सहजच सापडेल. आरत्या, कथासार वगैरेबद्दल म्हणाल तर या पंथातील लोक स्वतः काहीही करत नाही. कारण 'उ.शे.रा.'ने असे सांगून ठेवले आहे की "ठेविले 'उ.शे.रे.' तैसेचि रहावे, हाती असू द्यावे मॅकरोनी"...

तरीही जर 'त्या'च्यावर श्रद्धा असेल तर आपल्याला आरत्या/कथासार/स्तोत्रांचा आजच रात्री आपल्याला स्वप्नात दृष्टांत होईल. (कदाचित आर्पेटान नाहीतर बोसान्स्की भाषेतसुद्धा दृष्टांत होईल. पण काळजी नसावी, ती भाषा समजण्याची बुद्धीसुद्धा 'तो'च आपल्याला देईल.)

मला स्वप्नात सांगितले गेलेले स्तोत्र:

  

   

    

  

आमचे तीर्थक्षेत्र (कुरडईवाडी):

post1.jpg

मी वर मला स्वप्नात सांगितल्या गेलेल्या काही ओळी आणि आमच्या एका तीर्थक्षेत्राचे प्रकाशचित्र दिले आहेत. जर 'त्या'च्यावर पूर्ण श्रद्धा असेल तरच आपणांस ते दिसेल.

हे 'उ.शे.रा.'चे तृतीया एकवचन आहे. सुज्ञास सांगणे न लगे!