"संथ वाहते कृष्णामाई" अशी ओळ पाठीवर वागवत त्या कृष्णामाईप्रमाणेच संथ चालणाऱ्या ट्रकला ओवरटेक करून मी पुढे गेलो. बाजूने पास होताना "बोले तैसा चाले" ही उक्ती आठवल्याने त्या ट्रकच्या टायरला हात लावून नमस्कार करायचा मोह मी कसाबसा टाळला. ओतप्रोत भरणे म्हणजे काय ह्याचा योग्य नमुना असलेला आणि तारीख जवळ आलेल्या गर्भवती स्त्री प्रमाणे चालणारा तो ट्रक नि त्याचा चालक ह्यांना मनातल्या मनातच नमस्कार केला नि ढाब्याची वाट धरली. दुसरा चहा संपवतोय इतक्यात ती `कृष्णामाई ` आमच्या ढाब्याच्या अंगणातच डुलत डुलत अवतीर्ण झाली.
छान...
मस्त...