नमस्कार,

कागदावरील लिहिणे व कि-बोर्डवरील चाव्या वापरणे यात समन्वय असावा असे आपणास वाटते का? जर उत्तर 'हो' असेल तर त्यातील मर्यादा कोणत्या? संगणकाचा कि-बोर्ड ले-आऊट इंग्रजी भाषेच्या लेटरना व विराम-चिन्हांना स्थान देतो. इंग्रजी टाईप करण्यासाठी ९४ 'कळा' वापरल्या जातात. पहिल्या ओळीत १४, दुसऱ्या ओळीत १२, तिसऱ्या ओळीत ११ आणि चौथ्या ओळीत १०, अशा एकूण ४७ चाव्या असतात. प्रत्येक चावीला कॅपीटल व स्मॉल अशा दोन 'कळा' असतात. यातून ९४ 'कळा' भाषेच्या टायपींगसाठी वापरता येतात.

इंग्रजी भाषा या ९४ 'कळांमधून' संगणकात वावरते. एवढ्याच चाव्यांचा उपयोग करून इंग्रजी भाषेला प्रोग्रॅम बनवण्यात भाग घेता येतो. आजच्या संगणकाच्या अंतरंगातील सर्व रचना यावरच आधारीत आहेत. इंग्रजी लिपी व इंग्रजी फॉण्ट यांना त्यामुळे एकरूपता आली आहे. त्यामुळेच इंग्रजीला युनीकोडची गरज नसते.

इंग्रजी फॉण्टचा अर्थ, 'लिपी संगणकाच्या स्क्रिनवर दिसणे व स्क्रिनवर सादर झालेले चित्र, प्रिटींग करता येणे', एवढाच नसतो. मराठीने स्वतःला ९४ 'कळांमधे' बसवले तर तिला इंग्रजीसारखे संगणकात वावरता येईल का? मग मराठीला युनीकोडची गरज भासेल का?  ९४ 'कळांमधे' मराठीला बसवणे याला 'मराठीचा फॉण्ट बनवणे' म्हणावे का? ९४ 'कळांमधे' न बसवलेले फॉण्ट मराठी अक्षरांची चित्रे सादर करणारे, फक्त डॉइंग-टूल ठरतात का?

मराठी फॉण्टचा मूलभूत उद्देश संगणकाशी संवाद साधत मराठीला त्यातून वावरता येणे हा असावा का? मराठी अक्षराचे सौंदर्य हे संगणकातील वेगळे ऍप्लीकेशन ठरू शकते. कागदावरील मराठी लिपी कागदी-वृत्ती जोपासते. मराठी फॉण्टला इंग्रजी संगणकीय-वृत्ती जोपासता आली पाहिजे. इंग्रजी भाषेतून संगणकाची निर्मिती व विकास झाला, त्यामुळे मराठीसाठी फॉण्ट व लिपी यांच्या अर्थात निर्माण होणारा फरक जाणून 'मराठी फॉण्ट' निर्माण झाला पाहीजे.

मराठी भाषेची 'कागदी-वृत्ती' व आजच्या इंग्रजी संगणकातील मराठी भाषेची 'संगणकीय-वृत्ती' यात समन्वय साधणे म्हणजे कागदावर जसे मराठी लिहिले जाते, त्यात होणाऱ्या हातांच्या हालचालींप्रमाणे संगणकातल्या आकृतींना फॉण्टने साकारले तर तो जास्त 'मराठमोळा फॉण्ट' ठरेल का? आपल्याला काय वाटते? आपल्याला तसा फॉण्ट वापरून पहायचा आहे का? मी तसा फॉण्ट मोफत पाठवत आहे.

आपला, शुभानन गांगल

फोन ९१-२२-२६२०१४७३ , मोबाईल ९८३३१०२७२७ , ईमेल : दुवा क्र. १