११०८ प्रती करून (त्या ११०८ जणांना पाठविण्यासाठी) आताच आमच्या पोस्टात आल्या आहेत.  त्या या क्षणी मनोगतावर उपस्थित असणाऱ्या  गाणारा कडुनिंब, मनोज भाऊ, यतीन पोवळे, गोविंद तुकाराम आडके, चक्रधर१, संदीप दारव्हेकर, मुकुंद खानविलकर, सुनील वाळंबे, चित्तचोर वगैरे मनोगतींना पाठविण्यासाठी त्यांचे पत्ते घालून तयार आहेत, पण उरलेल्या प्रतींसाठी प्रशासकांनी अन्य मनोगतींचे पत्ते द्यावेत. जर हे लेख ११०८ जणांना पोचले तर "तो" आम्हांला बककळ इ-पैसा देणार आहे, या लेखाची चेष्टा केल्यास, तो पायदळी तुडविल्यास किंवा त्याचे बरे-वाईट झाल्यास आमचेही तसेच होईल असा इशारा त्या प्रतींमध्ये दिला गेला आहे. तेव्हा आमचे बरे किंवा वाईट करणे आता प्रशासकांच्या हाती आहे. त्यांनी आमच्यावर कृपा करावी, ही नम्र विनंती.

कळावे.

आपला विश्वासू,

मी_इ पोस्टमास्तर.