'कुल एडीट' फ्रीवेअर नाही. पण नेट वरून काही दिवसांकरता 'ट्रायल व्हर्जन' मिळते. त्यात भरपूर गाणे कट करून होतात.
मला मात्र कुल एडीटचे ट्रायल व्हर्जन एका कॉंप्यूटर मॅगेझीन सोबत आलेल्या सीडी मध्ये मिळाले होते.
तसेच 'गोल्ड वेव्ह' हे पण एक आहे. सर्च करा गुगलवर आणि डाउनलोड करा.
आणि हो, कटर सोबत जॉईनर सुद्धा आहेत. दोन कट केलेले टोन्स एकत्र करता येतात.
अधिक माहिती : 'कुल एडीट' हे सॉफ्टवेअर अनेक टेलीकॉम कंपनीज मध्ये टेलिफोनच्या विविध टोन्स ( डायल टोन, एंगेज टोन ) च्या कृत्रीम निर्माणासाठी आणि प्रयोग करण्यासाठी वापरतात.