आणखी.. असा महेशरावांनी सुचवलेला बदल योग्य वाटतो आहे. परंतु क्रियापद गेली नसून मेली आहे. काही प्रतीकांचे आणि कल्पननांचे प्रयोजन असे-
कवितेची पार्श्वभूमी म्हणजे माझे मुंबईतील घर. दोन वर्षे पावसाच्या - पूराच्या तडाख्यात सापडल्याने त्याची झालेली दुर्दशा आणि माझ्या मनातील जुन्या घराचे चित्र याचा ताळमेळ बसत नाही. तळाशी दाटलेल्या सावल्या म्हणजे जुन्या आठवणी. गच्चीवर सांडलेलं ऊन आणि इतर वर्णन मात्र आजचे घर.
मुंग्या अन्नकण ओळीने घेऊन जाताना मध्ये मध्ये थांबतात, भेटतात. रिकाम्या घरात जे काही उरले आहे आता ते ह्या मुंग्यांचे. त्यांचा किराणा, भुसारा. त्यांची ती हालचाल पाहून अशी ओळ सुचली. ( घरे घेणे तसे दुकाने घेणे)
वंशविस्तारवाढीमध्ये हे वंशविस्तार, वाढीमध्ये असे वाचावे ( टंकराक्षस! )
चक्रपाणिने म्हटल्याप्रमाणे 'तिचे' पुरावे असा काही अर्थ इथे अभिप्रेत नाही. आता रिकाम्या घरात कोणाचा वावर नाही. त्यामुळे कधीकधी ती शांतताही हवीहवीशी वाटते. पण घरात मात्र मन रमत नाही. पावसाच्या - पुराच्या पाण्याने सोडलेले पुरावे बघितले की लळा लावलेल्या या घराला आता एकटे वाऱ्यावर सोडल्याचे दुःख मात्र होते. ती शांतता हवी आहे पण आता असे घर मात्र पाहवत नाही असा आशय आहे...