गांगल साहेब, नमस्कार!
तुम्ही हा जो प्रतिसाद दिला आहे तो चुकीच्या ठिकाणी आहे, असं मला वाटतं. आपण आपल्याच 'शुद्धलेखनाचे पुस्तक प्रसिद्ध झाले' या लेखात तो द्यावयास हवा होता.
मनोगत वर कवी मनाची माणसं खूप आहेत. पण त्याच बरोबर मनोगतवरील काही वाचक चर्चा वा गद्य लेखन प्रकारात लेखन समजले नाही की 'शुद्धलेखनातील चूका' शोधायला लागतात. अशा काहींच्या त्या प्रतिसादाला वैतागलेल्या आदित्याने आपला राग ह्या लेखातून व्यक्त केला होता. आपण आपल्या लेखात आपणाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं टाळून इथं वेगळी चर्चा करणं योग्य वाटत नाही.
आपण चर्चा या सदरात हा विषय हाताळावा. तिथं मलाही या विषयावर आपल्याशी चर्चा करायला आवडेल. 'आधुनिकीकराणासाठी मराठी भाषेत सुधारणा' या विषयावर मलाही आपल्या सारखा रस आहे. 'सुधारणा' ह्या एकट्या माणसाकडून होत नसतात. त्यासाठी एकमेकांची साथ मिळवावीच लागते.
(व्यक्तिगत रोख व/वा विषयांतर वाटलेला भाग वगळला : प्रशासक)