माझ्या प्रथम प्रतिसादाने चांगलेच रण माजवले आहे. पण माझ्या 'उत्तरार्ध' या प्रतिसादावर स्वतः श्री. आदित्य जोशी यांनी काहीच मतप्रदर्शन केले नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. माझे  दोन्ही प्रतिसाद 'वृत्ती'विरोधात होते.व्यक्तीच्या नाही.दुर्दैवाने ते तसे 'अशुद्ध हेतुने' लिहीले आहेत असे समजूनच पुढील चर्चेला उगीचच वेगळा रंग चढला याचे वाईट वाटते. ही चर्चा साहित्यिक पातळीवरच राहायला हवी होती.
मी दोन्ही प्रतिसाद सारख्याच पोटतिडकीने लिहीले आहेत. अशुद्धलेखन हे कुठल्याही भाषिक लेखकाने विष मानायला हवे. कारण या विषाची थोडीशी मात्रा, मग ती अहेतुक वा सहेतुक वा बेफिकिरीने असो, घातकच ठरेल असे माझ्या बाळबुद्धीला वाटते व पटते. तसेच 'शुद्धलेखनाचा आग्रह धरणाऱ्यांकडेही शुद्ध नजरेनेच पाहा" हे प्रदीपचे वाक्यसुद्धा लक्षात घ्यावे.
हा प्रतिसाद स्पष्टीकरणासाठी आहे. क्षमायाचनेसाठी नाही असे नम्रपणाने सांगावेसे वाटते.
जयन्ता५२