-
चौकस,

तुमची कथनशैली वेगळी आहे. खिळवून ठेवणारी आहे. निरीक्षणशक्ती दांडगी आहे. पात्रांच्या मनांत उतरण्याचे आणि तेथील बारकावे टिपण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे. जिन्याखालच्या म्हातारीचे वर्णन भिडले.  मात्र, बांधणीच्या दृष्टीने ही कथा मला विसविशीत वाटली. पहिला भाग उत्तम वठला आहे. फारच आवडला. पुढील दोन भाग बारगळल्यासारखे वाटले. विजय आणि प्रताप...हे सारेच चित्रण काहीसे बटबटीत (आणि फिल्मीही) झाले आहे. विशेषतः गुरुजी आणि नंदिनीचे पुण्यात येणे आणि त्यांची गाठ नेमकी विजय आणि प्रताप यांच्याशीच पडणे...पुढचे फारमौस मधील अघटित वगैरे...

असे असले तरी तुमची शैली मला फारच भावली. तुम्ही लिहीत राहिले पाहिजे...मनापासून शुभेच्छा...

आठ ते ऐंशी  वाचून किरण नगरकर यांची सात सक्क त्रेचाळीस  ही कादंबरी आठवली. तीत त्यांनी सात ते सत्तर  म्हटले आहे. तुम्ही दहा वर्षे वाढवलीत, एवढेच !

.................

जाता जाता ः भिंतीवर बंदूक टांगलेली होती, असे वर्णन निवेदनाच्या ओघात कथा-कादंबरीत आले, तर पुढे कुठेतरी त्या बंदुकीचा वापर कथेतील-कादंबरीतील पात्राकडून झालाच पाहिजे, असे दस्तोव्हस्कीने कुठेसे म्हटल्याचे वाचनात आले होते. :-)