कथा आवडली. चौकस नावाभोवती आजवरच्या गद्य लेखनामुळे निर्माण झालेल्या अपेक्षांची पूर्ती करणारी होती. छायाताई आणि त्यांच्या मुलीबाबतचे वर्णन अनावश्यक जास्तीचे वाटले. सतबीरसिंग, नामदेव यांसारख्या  छायाकाकू आणि मृणाल ह्या त्या गाडीतल्या प्रवासी असताना इतरांच्या तुलनेत त्यांच्यासाठी जास्त शब्द खर्च झाल्यासारखे वाटले.  गाडीतील सहप्रवाशांच्या वर्णनामुळे कथेची लांबी  अनावश्यक वाढली आहे असे वाटले. मात्र  प्रभावी शब्दयोजना आणि वाक्यरचना, उत्तम निरीक्षण ह्यामुळे कथा लांबली असूनही वाचायची सोडाविशी वाटत नाही. विजय आणि प्रतापबाबतीत बटबटीत चित्रणाबद्दल प्रदीप कुलकर्णींशी सहमत.