चित्त,
वृत्तात लिहिण्याकरता वृत्तांची नावे लक्षात ठेवण्याची गरज नाही, म्हणूनच माहितीकरता असे मी म्हटले आहे. माझ्या या प्रतिसादाला मनोगतावरील एका जुन्या चर्चेचा/ लेखनाचा संदर्भ आहे. ज्यात महेश यांनी एका वृत्तापासून सुरुवात करत एकापासून वेगवेगळी वृत्ते कशी निघत जातात ते दाखवले होते. प्रत्यक्षात अशाच गंमतशीरपणे वृत्ते झालेली दिसतात.
महेश, त्या लेखाचा संदर्भ / दुवा मिळाला जर जरूर द्यावा अशी विनंती.