वृत्तात लिहिण्याकरता वृत्तांची नावे लक्षात ठेवण्याची गरज नाही, म्हणूनच
माहितीकरता असे मी म्हटले आहे. माझ्या या प्रतिसादाला मनोगतावरील एका
जुन्या चर्चेचा/ लेखनाचा संदर्भ आहे. ज्यात महेश यांनी एका वृत्तापासून
सुरुवात करत एकापासून वेगवेगळी वृत्ते कशी निघत जातात ते दाखवले होते.
प्रत्यक्षात अशाच गंमतशीरपणे वृत्ते झालेली दिसतात.
तुमचे बरोबरच आहे. तो लेख मी वाचला होता. एकंदरच मला वृत्तांची नावे सांगणाऱ्यांचे किंवा त्या नावांबद्दल कुतूहल असणाऱ्याचे फार कौतुक वाटते. पण 'प्रमीला'ऐवजी 'ढमीला' हे नाव असते तरी काही बिघडले नसते. पण 'ढमीला' हे नाव छान वाटते आहे.