पहिला भाग छान आहे. पण नंतर पंचनामा अपेक्षाभंग करणारा. काही ठिकाणी तपशिलांचा व्यसनात्मक भरणा आढळतो. काही ठिकाणी अनावश्यक 'भागलपुरी' संवाद आहेत, तर काही ठिकाणी 'पोलिस टाइम्स'च्या सोज्ज्वळ आवृत्तीतल्या एखाद्या कव्हर स्टोरीतला एखादा उतारा वाचल्यासारखे. मध्येच टिव्हीवरील एखाद्या क्राइमशो बघतो आहे असेही वाटून गेले. वाचून झाल्यावर 'हे सगळे' कथेत कशासाठी ह्याचा विचार करत बसलो.