लेखकाच्या आतापर्यंतच्या लेखनाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षाभंग झाल्यासारखा वाटला. मूळ कथासूत्रातच बेताचाच जीव आहे. त्यातून त्याला फुटलेले फाटे पसरत गेल्यासारखे आहेत. दारु, व्यसने, मलमूत्रविसर्जन आणि लैंगिक संबंध यांचे काही उल्लेख अनावश्यकरीत्या ओढूनताणून केलेले वाटतात. अर्थात त्याचे मला वावडे आहे अशातला भाग नाही. पण एकंदरीतच कथेला बसकटपणा आला आहे. अर्थात निरीक्षण आणि शैली याबाबत वादच नाही. (अन्यथा ही कथा शेवटपर्यंत वाचवलीच नसती) पण म्हणूनच कदाचित हे दोष ठळकपणे उठून दिसतात. 'निळ्या काचेचे पेन' च्या लेखकाकडून यापेक्षा सरस लेखनाच्या अपेक्षा आहेत - हे माझे मत कुणाला कितीही पूर्वगृहदूषित वाटले तरी!
आपुलकीपोटी स्पष्ट लिहिले, राग नसावा.