आवडली कथा. 

त्या शिळेजवळ जाऊन तो थांबला. दोन खोल श्वास त्याने भिरकावल्यासारखे सभोवताली फेकले आणि खाली वाकून शिळेला हात घातला.

वा...वा...

'युगानुयुगे' किनाऱ्यावर नुसते डोके आपटत राहायचे म्हटल्यावर लाटांनीही एव्हाना शरणागती पत्करली असती. त्यामुळे भरती-ओहोटीचा खुळखुळा पुढे करावा लागला.

सुंदर...

आणि अचानक, झाडाच्या खोडातून स्रवलेल्या डिंकाला बेसावध भुंगा चिकटून बसावा तशी ती शिळा त्या माथ्यावर घट्ट चिकटून बसली.

छान...

शुभेच्छा.

जी. ए. कुलकर्णी यांच्या रूपककथांची आठवण झाली. आपण त्या कथा नक्कीच वाचल्या असणार...पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा कथा आहेत त्या. :)

पर्वत चढायला घेतला...ही वाक्यरचना खटकली.  तिने भाजी चिरायला घेतली,  यासारखे वाटले हे वाक्य. पर्वत जागच्या जागीच आहे...तो चढायला घेता कसा येईल ?
तो पर्वत चढू लागला, त्याने पर्वत चढायला सुरुवात केली, [रूपककथेची भारदस्त भाषा वापरायची तर फारतर प्रारंभ केला असेही म्हणता येईल :) ]  असे मी वाचले....पण तुमची ती शैली असावी, असे दिसते...असो.
पंचनामा तही अशीच वाक्यरचना अनेक ठिकाणी आहे.

शुभेच्छा, पुन्हा एकदा.