आणि अचानक, झाडाच्या खोडातून स्रवलेल्या डिंकाला बेसावध भुंगा चिकटून बसावा तशी ती शिळा त्या माथ्यावर घट्ट चिकटून बसली.
तो अंतर्बाह्य थरारला.
आणि जिवाच्या कराराने तिला खाली ढकलायचा प्रयत्न करू लागला.
ज्यादिवशी ही शिळा माथ्यावर घट्ट चिकटून बसेल त्यादिवशी त्याची शिक्षा तरी संपत असावी किंवा अशीच एखादी शक्यता अपेक्षित असावी. ती कोणती असावी आणि त्याचं अंतर्बाह्य थरारण्याचं कारण काय असावं याचा विचार करतोय पण काही अंदाज करता येत नाही.
पु. ले. शु. !