भाषेच्या वेगळेपणा मुळे दाक्षिणात्य मंडळी संपूर्ण भारत देशाशी जोडली गेली नसावीत. पण त्याच बरोबर सत्तेपुढे नमतं घ्यावं हा ही त्यांचा बहुतांशी स्वभाव असावा. अजानूकर्णांनी जी माहिती दिलीय त्यावरून तिथं ही स्वातंत्रा साठी लढणारी नेते मंडळी होती हे कळलं. माहिती बद्दल थॅक्स! पण जी नावे दिली आहेत ती नक्कीच राष्ट्रीय स्तरावरची नेते मंडळी असतील असं वाटत नाही. सुलतान वा राणी हे सामान्यातून उगवलेले नेतृत्व म्हणता येत नाही.