मला वाटतं झाशीच्या राणीप्रमाणे चेन्नम्माचा इतिहासही प्रसिद्ध आहे. राजे-राण्या सोडल्यातर मराठी नेते तरी महाराष्ट्र सोडून कोणाला माहित आहेत? बऱ्याच उत्तर आणि दक्षिण भारतीयांनी सावरकरांचे नाव कधीही ऐकलेले नाही आणि तिलक नामका कोई फ्रीडम फाईटर था ना! इतकीच माहिती असते. अन्यथा, राजगुरू माहित नसतो, भगतसिंगच माहित असतो. तात्या टोपे, फडके, गोपाळकृष्ण गोखले, चाफेकर, कान्हेरे अशी नावे त्यांनी बापजन्मात ऐकलेली नसतात.  अर्थातच, बिगर मराठी माणसांना नावे ठेवण्याचा उद्देश नाही कारण ते आणि आम्ही, आपण सर्वच एका नावेचे प्रवासी असण्याचा संभव आहे.... त्यांना आपले नेते माहित नाहीत आणि आपल्याला त्यांचे... याचे दुसरे कारण असेही असू शकते की राष्ट्रीय स्तरावर गांधी-नेहरू एवढेच नेते झाले.