ऑडॅसिटी फ्रीवेअर मिळाले. धन्यवाद. पण, जेव्हा त्यातील फाईल कट करून एक्स्पोर्ट आणि सेव ऍज एमपीथ्री करण्याचा प्रयत्न केला तर ते lame_enc.dll नावाची फाईल मागतं. ती फाईल नसल्याने कट केलेली फाईल एमपीथ्री फॉरमॅटमध्ये सेव करता येत नाही. फक्त डॉट एयूसी नावाचा फॉरमॅट सेव होतो. पण तो मोबाईलला चालत नाही. आपण एखादा उपाय सुचवू शकता का? ही फाईल मिळेल का?