बिहारीसुद्धा तिथल्या जनावरांचं वर्षानुवर्षं मराठीतलं रेकणं ऐकून मराठी बोलायला शिकले आहेत. आमच्या जित्राबांची ( जनावरांची ) वासरं-गोऱ्हेसुद्धा आता बिहारीतून रेकायला शिकतील. त्यासाठी आम्ही काही नियम कायदे करीत बसलो नाही. सहवासातनं हे सहज घडून येतं. शतकानुशतके येथे राहिलेले मारवाडी-सिंधी मराठी चांगलं बोलतात. भाषा हा सक्तीचा विषय होऊ नये. कानडी प्रदेशात राहणाऱ्या मराठी माणसांच्या बाबतीतही आम्ही हेच म्हटलं होतं. गुंडगीरी मात्र कोणाचीच चालू देऊ नये, अगदी मराठी माणसांचीही.