तुमचे शेवईपंथाचे दोनही लेख आणि जालावर उपलब्ध शेवईपंथाबद्दलचे लिखाण वाचले.. मजा आली...

तुमचे प्रतिसाद सुद्धा मजेदार आहेत. शेवईराक्षसाची कृपाच दिसते तुमच्यावर.


असेच :)

अवांतर :
आमच्या एका मित्राने सांगितल्यानुसार डॉ. प. वि. वर्तक ह्यांचे 'ब्रह्मर्षीची स्मरणयात्रा' हे पुस्तक आता वाचायलाच हवे. सूक्ष्मदेहाने ह्या पुस्तकाचे लेखक मंगळावर गेले होते असे म्हणतात.  म्हणजे 'फीनिक्स मार्स लँडर' किंवा इतर यानांमध्ये काही बिघाड झाल्यास लगेच लेखक सूक्ष्मदेहाने तिथे जाऊन डागडुजी करू शकतील, असेही वाटून गेले. थोडक्यात नासाने ब्रह्मर्षींना मेंटेनन्सचा ठेका द्यायला हवा.