संजोपराव, हे काय नशीबी आले? कविता चक्क वृत्तात वगैरे आहे. छानच जमली आहे. "या अंधाराने हात ओलसर दिशादिशांना पुसले", "फूल एकटे हाती उरले तेही पण हिरमुसले" ह्या ओळी फारफार आवडल्या. अंधाराने ओलसर हात दिशादिशांना पुसण्याची कल्पना तर अगदी मस्त.'खसफसले' हे यमक वापरल्याचा आनंदही झाला. तुमच्या आगामी गझलेला मनापासून शुभेच्छा!!! आता हे एकदा नशीबी आले आहेच तर सतत येत राहू  द्या.