रेडियो पाकिस्तानवरून आठवले. रेडियो पाकिस्तानवरचा स्टुडियो नंबर १२ हा कार्यक्रम मी जवळपास नियमितपणे (१९८४ ते १९८८ च्या दरम्यान) ऐकत असे. श्रोत्यांशी गप्पा, उर्दू शेरांची देवाणघेवाण, अधूनमधून गाणी असे त्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या निवेदकाचे नाव मुमताज महलसी. फार चांगला कार्यक्रम होता. अनेक चांगली पाकिस्तानी गाणी मी याच काळात ऐकली. ह्याच काळात झिया उल हकच्या तोंडून एका भाषणात (ते भाषण भारताच्या संदर्भात नव्हते) "गंगा उलटी बह रही है" असे काहीसे वाक्य ऐकले होते तेव्हा खूप गंमत वाटली होती. आता वाटत नाही.