लिहिताना मला पण मज्जा आली होती.
मी शेवईराक्षसाचा निस्सीम भक्त असल्याने आणि 'त्या'च्यावर माझी पूर्ण श्रद्धा असल्याने 'त्या'ची माझ्यावर कृपा असणे साहजिकच आहे. हो पण नुसती श्रद्धा असून पुरत नाही (faith is very much necessary but not sufficient), तर तितकीच जबरदस्त साधनादेखील आवश्यक आहे.
अहो, आम्ही कोण मायावादाचा आधार घ्यायचा की नाही हे ठरवणारे? हे सर्व तर 'त्या'नेच ठरवून ठेवले आहे. त्यात ढवळाढवळ करणारे आपण कोण? (खरं सांगू का? हा मायावादसुद्धा त्याचीच निर्मिती आहे. तो जर इतर कोणी वेगळ्या संदर्भात वापरत असेल तर ती 'त्या'चीच इच्छा आहे असे आपण समजावे.)
आम्ही काही वेगळे वाद तयार करण्याची गरज नाहीये अन् कोणत्याही वादाबाबत चिंता करण्याचीदेखील गरज नाहीये. त्याच्या वादांची काळजी तो निश्चितच घेत असतो. इतर कोणत्या 'प्रतिकूल' वादांचीदेखील भीती बाळगण्याचे कारण नाही. 'त्या'नेच एके ठिकाणी म्हणून ठेवले आहे: यदा यदा हि वादस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमवादस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥१
असो...
(नेहमीप्रमाणेच) कश्रअ
- चैत रे चैत.
१ह.घ्या.