केदार,

कुलदीप पवार यांच्या अभिनयाबद्दल  आपण अभिप्राय विचारला आहे.

कुलदीप पवार हे लौकिकार्थाने खूप प्रसिद्ध आणि यशस्वी असे अभिनेते नसतीलही पण त्यांच्या काही  चित्रपटातील आणि मालिकांमधील भूमिका खूपच गाजल्या.

राजा ललकारी अशी दे हे गाजलेले गाणे त्यांच्यावर चित्रित झाले आहे.
याशिवाय त्यांचा अभिनय असलेला गुपचुप गुपचुप हा चित्रपट चांगला चालला.

काही चित्रपटात त्यांनी खलनायकही चांगला वठवला तसेच अनेक विनोदी भूमिकाही केल्या.

दूरदर्शनवरील अधिकारी ब्रदर्स निर्मित परमवीर या मालिकेला त्याकाळात चांगलाच टीआरपी मिळाला होता. ही भूमिका म्हणजे पवार यांच्या कारकिर्दीतील यशोशिखर म्हणता येईल.

याशिवाय नेहमीच्या सासू सुनेवरील भडक मालिकांपेक्षा वेगळी आणि खुसखुशीत विनोदांनी भरलेली अशी मालिका म्हणजे सचिन पिळगावकर दिग्दर्शित तू तू मैं मैं. यातही त्यांची मध्यवर्ती भूमिका नसली तरी त्यांनी गरीब बिचाऱ्या सासरेबुवांची भूमिका छानच केली होती. सध्या बहुधा ईटीव्ही वरील एका मालिकेमध्ये ते दिसतात.पण ती मालिका मी पाहात नाही. 

खालील दुव्यावर कुलदीप पवार यांच्याबद्दल अधिक माहिती मिळेल.

दुवा क्र. १

जे पी मॉर्गनजी,

कोणावर टीका करताना एवढे पहा की आपण स्वतः त्या क्षेत्रात तरी आहोत का? आणि अन्य क्षेत्रात असल्यास त्या व्यक्तीच्या एक शतांशाने तरी प्रसिद्ध आहोत का? कोणाला यश मिळते , कोणाला मिळत नाही. काही गायक/ गायिका केवळ एका हीट गाण्यामुळे वर्षानुवर्षे ओळखले जातात. तरीही त्या कलाकारांबद्दल आदराने बोलले जाते.मग अनेक भूमिका केलेल्या एखाद्या कलाकाराबद्दल असे बोलणे कितपत योग्य आहे?
कुलदीप पवार हे नाव गुगल मध्ये शोधल्यास काही हजार तरी शोध मिळतील. त्याहून अधिक जे पी मॉर्गन दिल्यास मिळतील. पण ते जे पी मॉर्गन तुम्ही नसाल. टोपण नाव घेऊन टीका करणे खूप सोपे असते.करायची तर ती सकारात्मक करा. नकारात्मक नको. 

असो..एखाद्या चर्चेवर प्रतिसाद न येणे हा ती व्यक्ती किती प्रसिद्ध आहे याचा निकष होऊ शकत नाही.

तरी कृपया हलकेच घ्यावे.