प्रॉन्स असे अळ्यांसारखे का दिसताहेत बुवा? आणि ही तीन कमलपुष्पे हातात घेतलेला तरुण कोण?
पारव्याचा गळा दाबावा असे का वाटते कळाले नाही
!

प्रॉन्समधले देखील मला काहीही कळत नाही. टबात पाण्यात ठेवल्यामुळे ते तसे दिसत असावेत. तीन कमलपुष्पे घेतलेला तरुण त्या तलावात अंघोळ करत होता, त्याची परवानगी न काढता हे छायाचित्र दिल्याबद्दल मी दिलगीर आहे. मात्र तो मी नाही हे नक्की!   बाकी पारव्यांचा गळा दाबावा वाटण्याबद्दल 'का कोण जाणे' असा उल्लेख आहेच. कदाचित त्यांच्या उपद्रवी वृत्तीमुळे असावे. मात्र त्यांचा नुसता गळा दाबावा वाटतो, त्यांना मारावेसे वाटत नाही हे नक्की.