दुष्यंतपुत्र भरत याच्या नावावरून हा भुभाग भरतखण्ड, भरतवर्ष याप्रकारे ओळखला जातो, जो काळ चांगलाच मागचा आहे. कालांतराने त्याचा उल्लेख भारत असा झाला.
हिंदुस्थान हा शब्द हिंदुकुश पर्वतरांगांच्या पलिकडे राहणाऱ्या लोकांसाठी म्हणून वापरण्यात येतो अन् स्थानाला हिंदुस्थान असे म्हणतात असेही कुठेतरी वाचलेले स्मरते. पण हा शब्द अर्वाचीन असावा अन् आक्रमकांमुळे अस्तित्वात आला असावा असे वाटते.
इंडिया हा शब्द युरोपीयन्सनी अस्तित्वात आणला. त्याबद्दलही बरेच संभ्रम आहेत की याची मुख्यत्वे उत्पत्ती कशी झाली. काही वर उल्लेखलेले आहेत. एक प्रवाद आणखीही आहे की जसे अमेरिकेतल्या मूळ जमातीला रेड इंडियन्स म्हटले जाते तसेच इथल्या लोकांना युरोपीयन्सनी इंडियन्स अन् त्यांच्या स्थानाला इंडिया असे म्हटले असावे. पण याहीबद्दल वाद आहेत... रेड इंडियन्स हे नाव त्या जमातीचे अगोदरचे नाव होते की युरोपीयन्सनी तसे दिले... वगैरे.
वीर सावरकरांच्या "सहा सोनेरी पाने" या पुस्तकात बहुदा या विषयावर काही उल्लेख आहे.
अर्थात हे सारे माझे मत. चू. भु. द्या. घ्या.