टीका सकारात्मक करावी, नकारात्मक नको ह्या तुमच्या मताशी मी सहमत नाही. एखाद्याला तसेच जे पी मॉर्गन ह्यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आम्ही नाकारू शकत नाही. एखादा मतदार (मत देणारा) कुठल्या क्षेत्रात आहे ह्यावरून मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य किंवा त्या स्वातंत्र्याची व्याप्ती ठरवणे चुकीचे. प्रत्येक प्रतिसाद हे प्रतिसाद देणाऱ्याचे वैयक्तिक मत असते. सार्वकालिक, वैश्विक सत्य नसते, असे मला वाटते. अर्थात मतदाराचा वकूब बघून त्याच्या मताला किती किंमत द्यायची हे कळायला मदत होते. जे पी मॉर्गन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनय 'शिकून' आले असल्यास माहीत नाही. मणिरत्नमकडे कदाचित असिस्टंट म्हणूनही असू शकतील कोणे एके काळी. (मणिरत्नम हे लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक म्हणून ठीक आहेत. ह्यांच्या चित्रपटांची निर्मितिमूल्ये बरी असतात आणि काही चित्रपटांत मनिषा कोयराला आणि प्रीती झिंटा ह्या आम्हाला आवडणाऱ्या 'नट्या' बघायला आम्हाला आवडले होते.) कुलदीप पवार अभिनेते म्हणून ठीक वाटतात. काही काही जागी त्यांनी बऱ्यापैकी छान अभिनय केला आहे. मी चित्रपट आणि नाटक ह्या क्षेत्राशी संबंधित नाही हेदेखील नमूद करावेसे वाटते.

बाकी तुम्ही दिलेली माहिती छान आहे. हा दुवा बघा. इथे चांगली माहिती आहे.


अवांतर :
मी मराठीतून "कुलदीप पवार" हा शब्दसमूह गुगलून पाहिला.  गूगलने एकूण ५९ शोध लावले. (दुवा १ बघा.) जवळपास सारख्या असलेल्या आलेल्या नोंदी धरल्यास एकूण १९. (दुवा २ बघा.) इंग्रजीतून "Kuldip Pawar" गुगलून काढल्यावर एकूण ३९८ निकाल मिळाले. (दुवा ३ ) ह्यातले अनेक निकाल आपल्या कुलदीप पवारांशी किंवा त्यांच्या क्षेत्राशी संबंधित नव्हते. जवळपास सारख्या नोंदी धरल्यास एकूण ७४. (दुवा ३)
(प्रत्येक वेळी वरील आकडे ५-१० ने कमी जास्त होऊ शकतात.)