आपण म्हणता तेही योग्य आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुलदीप पवारांचा मी चाहता किंवा पंखा नाही, पण कुणाबद्दल वाईट लिहून काय मिळणार आहे या विचाराने मत मांडले आहे. मागे मनोगतवर वाचले आहे की व्यक्तिगत टीका नसावी .. त्या अनुषंगाने हा विचार व्यक्त केला आहे.
असो.. मी इंग्रजी स्पेलींग टाकून गुगलून पाहिले. (गुगलून हा शब्द मस्तच. बुकलून, खळबळून या जातीतला वाटतो)
Kuldip तसेच Kuldeep अशी वेगवेगळी स्पेलींग लिहिल्यास मिळणारी शोधसंख्या वेगवेगळी मिळते व ती काही हजारात गेली. मराठीत लिहून पाहिले नव्हते.