"आपण सर्वच एका नावेचे प्रवासी असण्याचा संभव आहे.... त्यांना आपले नेते माहित नाहीत आणि आपल्याला त्यांचे... याचे दुसरे कारण असेही असू शकते की राष्ट्रीय स्तरावर गांधी-नेहरू एवढेच नेते झाले."
प्रियालीताई, "आमचं" नाव साऱ्या देशाला माहित आहे असं गृहित धरू ना?
मुळात प्रश्न ब्रिटिशांच्या नि गांधी-नेहरूंच्या प्रभावाचा आहे. गांधीपूर्व कालखंड हा हिंसक नि त्यातही ईस्ट इंडिया कंपनीशी झालेल्या १८५७ च्या उठावाच्या पार्श्वभूमीवरचा आहे. गांधींचं तत्त्वज्ञान हे या पार्श्वभूमीपेक्षा एकदमच वेगळं होतं. गांधींचा त्या काळातल्या पुढाऱ्यांपैकी मोतीलाल नेहरूंशी (व त्यामुळे जवाहरलाल यांच्याशी) संपर्क प्रथम आला. यामुळे गांधी-नेहरू ही जोडी निर्माण झाली. (योगायोगाने त्याच काळात ईस्ट इंडिया कंपनीकडची सत्ता १८५७ च्या राणीच्या जाहीरनाम्याद्वारे बिटीश संसदेकडे गेलेली होती.) हाच संपर्क जर राधाकृष्णन वगैरेंसारख्या दाक्षिणात्य पुढाऱ्यांशी आला असता तर ही जोडी बदललेली दिसली असती.
अजून एक गोष्ट अशी, की भारतीय स्वातंत्र्य लढा म्हटले की ब्रिटीश आठवतात. दाक्षिणात्य प्रदेश बऱ्याच प्रमाणात पोर्तुगीज, डच यांच्या अधिपत्याखाली होता. आपण जो इतिहास शिकलो, तो बराचसा ब्रिटिशांचा आहे. एखादे प्रकरण डच- पोर्तुगिजांसाठी असे. अशा परिस्थितीत दक्षिण भारतातल्या पुढाऱ्यांची माहिती कशी मिळणार. गांधींचा संघर्ष डच पोर्तुगिजांशी झाला होता का, म्हणून काँग्रेसी शासनाने त्यांचा नि त्या संघर्षातल्या अन्य दक्षिणी पुढाऱ्यांचा इतिहासात अंतर्भाव करावा. (हे मात्र ऑफ दि रेकॉर्ड बरं का ! नाहीतर दिल्ली आम्हांला अजून दूर जायची.)
आम्ही तर बारामतीकर