मनोगतावर पाककृती लिहून प्रकाशित करताना एक लक्षात घ्यावे.
मनोगतावर पाककृतींची लेखनसुविधा ही विशेषकरून पाककृतीचे जिन्नस, कृती इ. डोळ्यासमोर ठेवून कष्टपूर्वकरीत्या तशी घडवलेली आहे. पुढे पाककृती जिन्नसांच्या अनुरोधाने शोधता याव्यात हाही त्यामागे हेतू आहे. हे लक्षात घेऊन एका रकान्यात वेगवेगळ्या जिन्नसांची सरमिसळ होणार नाही असे पाहावे.
उदा. ह्या पाककृतींत गाजरे, साखर, तूप, वेलची पूड आणि बदाम पिस्ते हे वेगवेगळ्या रकान्यात भरायला हवे होते असे वाटते.
हे समजून घ्यायला किंवा कृतीत आणायला काही अडचण असेल तर ती सांगावी.