रिंग टोन्स म्हणजे आपला भ्रमणध्वनी आपल्या जवळ असताना जी धून आपणांस ऐकू येते ती..... व कॉलर ट्यून म्हणजे जर निमिष ने माझा क्रमांक फिरवला तर त्याला रिंग (घंटी) ऐकवण्या ऐवजी माझ्या आवडते गाणे मी लावलेले असते ते ऐकू येईल... असा माझा समज आहे.
रिंग टोन्स वर कॉपीराईट कायदा आणणे कठीण वाटते कारण लाखो करोडो गीतांमधून आपण रिंग टोन उतरवून घेतो. माझा भ्रमणध्वनी माझ्या खिशात असताना त्यावर कोणती रिंग टोन ऐकू येते हे सहजा सहजी (जोवर कुणी वैयक्तिक रितीने माझ्या जवळ नसेल तोवर) समजणे कठीण आहे.
परंतु कॉलर ट्यून वर कॉपी राईट लावणे सोपे आहे. असेही कॉलर ट्यून चे भाडे कंपनीला मिळतच असते त्यातून त्यांनी कॉपीराईटचे पैसे भरणे त्यांना सहज शक्य आहे असे वाटते.
चु. भू. द्या. घ्या.