तो समुद्र आणिल लाट पुन्हा
अन पुसून टाकिल जुन्या खुणा

    लाटांवर उठतील लाटा
    त्या हरवून जातिल वाटा
    वाटांवर अलगद उठल्या
    तो मिटवून टाकिल पदचिन्हा !

अबोल अस्फुट प्रीती
रेखियली रेतीवरती
परी घेउन येता भरती
निष्ठूर! ना सोडी मुळी कुणा - !

    कधी रुद्ध कधी मंजूळ
    कधी महाभयंकर शीळ
    प्रारब्धच हे जडशीळ !
    निर्दयास पाहून ये करुणा - !

सुरेख!