भोकरांच्या लोणच्यात भोकरांएवढ्याच कैऱ्या टाकाव्यात असे मला वाटते. त्याने भोकराचा उग्रटपणा निघून जातो. ह्याच लोणच्यात थोडी गरमरे किंवा कच्ची करवंदे टाकल्यास अजून उत्तम स्वाद येतो.
खास टिपः झणझणीत पेक्षा नाकात चढणारे लोणचे चवदार लागते. त्यासाठी कुठल्याही लोणच्यात मोहरीची डाळ व तेल ह्यांचे मिश्रण चांगले फेटून घेतल्यास असे लोणचे नाकात चढते (थेट मेंदूपर्यंत झिणझीण्या येतात.)
मोहरी फेटताना चांगला हात दुखेपर्यंत व मोहरीला भरपूर फेस येईपर्यंत फेटावी.
वैशाली कामतांच्या प्रश्नाबद्दल- बीया काढतानाच बराचसा चीक निघून जातो. उरलेला राहीला तरी चालतो व त्यानेही चव वाढते.