टीका नकारात्मक नसावी म्हणजे काय? आणि प्रत्येक क्षेत्रात आपण काहीतरी मिळवले असले तरच टीका करण्याचा अधिकार प्राप्त होतो, हे कसे काय? हे म्हणजे सचिन तेंडुलकरने आता निवृत्त व्हावे असे म्हणणाऱ्याने प्रत्येकाने किमान प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात चाळीस तरी शतके ठोकली असली पाहिलेत, असे म्हणण्यासारखे आहे. कुलदीप पवार हा एक सामान्य - ठीक आहे, सुमार हा शब्द बदलून पाहू - अभिनेता आहे हे लिहिण्यासाठी स्वतः एखादे तरी फिल्मफेअर ऍवॉर्ड जिंकलेले असणे आवश्यक आहे, असे मला वाटत नाही.
या विषयावरील चर्चेला आता इतक्या दिवसांत इतके मोजके प्रतिसाद हे बोलके आहे, हे जे पी मॉर्गन यांचे मत पटले.