जो कधी होता अडोसा आपला तो सोनचाफा

आणि आला शेवटी माझ्या घरी जो तो लिफाफा-

का सुगंधी? हाच आता शोध घेतो!

तो लिफाफा जाळला मी, सोनचाफा टाळला मी

अंतरी कवटाळला तो गंध घेतो !

अन तुझ्या भाळी सजे, ते गंध जे चंद्राकृतीचे

गंध नाही, तेच माझे रक्त आहे !

खूप सुंदर ओळी! आवडल्या. शेवट एकदम जबरदस्त!

अवांतरः  दापोलीहून मागच्याच आठवड्यात सोनचाफ्याचे रोप आणले, पन्नास रुपयांना पडले. त्याची आठवण झाली.